
आंबा बागायतदारांच्या व्याजमाफीसाठी प्रस्ताव न पाठवणाऱ्या बँकांना टाळे ठोकणार — आमदार उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांचे व्याजमाफी ,शेतकरी सन्मान योजनेचे प्रस्ताव लीड बँक व महाराष्ट्र बँकेनी पाठवलेले नाहीत या प्रकरणात बँका आपल्या फायद्यासाठी जाणीवपूर्व दुर्लक्ष करून आंबा बागा दार शेतकऱयांचे नुकसान करीत आहेतआता जिल्हाधिकारी यांच्यासमोर ठरल्याप्रमाणे तहसीलदारानि प्रस्तावावर सह्या करूनबँकांकडे पाठवल्यानंतर लीड बँक , बँक ऑफ महाराष्ट्र वअन्य बँकांनी आठ दिवसांच्या आत पुढे प्रस्ताव पाठवले नाही तर या बँकांना टाळे ठोकण्यात येईल असा इशारा म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी दिला आहे
नुकत्याच झालेल्या बँक अधिकाऱ्यांना बरोबरच्या बैठकीतआंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या प्रस्तावावर तहसीलदारांच्या सह्या नसल्यामुळे आपण प्रस्ताव पुढे पाठवले नसल्याचे ते कारण सांगत आहेत चार वर्षांपासून आंबा बागायतदारांना या योजनांचा फायदा मिळालेला नाही आता चार वर्षांनी बँक अधिकाऱ्यांना कळले की त्यावर तहसीलदारांच्या सह्या नाहीत हे बँकांचे वेळकाढू धोरण म्हणजे शेतकऱ्यांना माफी योजनेचा फायदा मिळू नये यासाठी आहे मात्र याबाबत आता आपण गप्प बसणार नसून आंबा बागायतदार शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळवून देणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
www.konkantoday.com