
जिल्हा परिषद व पंचायत समिती गट, गणाची प्रारुप प्रभाग रचना२१ जुलै पर्यंत हरकती सूचना पाठवाव्यात – जिल्हाधिकारी
*रत्नागिरी, दि. 14 : महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 (सन 1962 चा अधिनियम 5) चे कलम 12 पोटकलम (1) अन्वये रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी त्या जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व कलम 58 (1) (अ) अन्वये पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणाच्या प्रारुप प्रभाग रचनेबाबत राज्य शासन किंवा राज्य शासनाने प्राधिकृत केलेला अधिकारी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या क्रमांक/ससाशा/डेस्क- 12/जिपपंस/निवडणूक 2025/07/2025 दिनांक 14/07/2025 च्या आदेशाच्या मसुद्याची प्रत खाली दर्शविलेल्या ठिकाणी प्रसिध्द करण्यात येत आहे. उक्त मसुदा राज्य शासन किंवा राज्य शासनाने प्राधिकृत केलेला अधिकारी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडून त्या आदेशात नमूद केल्यानुसार दिनांक 21/07/2025 नंतर विचारात घेण्यात येईल.
आदेशाच्या मसुद्याची प्रत जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचे कार्यालयातील फलकावर, जिल्हा परिषद रत्नागिरी कार्यालयातील फलकावर, तहसीलदार मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर यांच्या कार्यालयातील फलकावर तसेच पंचायत समिती मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर यांच्या कार्यालयातील फलकावर करण्यात आली आहे.
आदेशाच्या मसुद्यास कुणाची हरकत किंवा सूचना असल्यास त्यासंबंधीची जी सकारण लेखी निवेदने/ हरकती/सूचना जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी प्राधिकृत केलेले हरकत असलेल्या निवडणूक विभागाचे तहसीलदार यांच्याकडे दिनांक 21/07/2025 पर्यंत सादर करावेत. उपरोक्त तारखेनंतर जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी प्राधिकृत केलेले हरकत असलेल्या निवडणूक विभागाचे संबंधित तहसीलदार यांच्याकडे आलेली निवेदने/हरकती / सूचना इत्यादी विचारात घेतले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.