गृहमंत्री अमित शाह यांचे कलम ३७० काश्मीरमधून हटवण्याची संसदेत शिफारस
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याची शिफारस संसदेत मांडली.मागच्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये मोठया प्रमाणावर सैन्यबळ वाढवण्यात आले आहे. सोमवारी मध्यरात्री जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष ओमर अब्दुल्ला या दोघांनाही नजरकैद करण्यात आले.या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संसदेत निवेदन करत आहेत.तसेच संसदेत चार विधेयके मांडणार आहोत. ती सर्व काश्मीरसंबंधीच आहेत असेही ते म्हणाले.