कोकणातील खोदचित्र पुस्तिका पर्यटकांना मार्गदर्शक ठरेल ः जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण
रत्नागिरी ः कोकणातील अश्मयुगीन खोदचित्र शोध-संरक्षण आणि संवर्धन या विषयावर प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती पुस्तिका पर्यटकांसाठी मार्गदर्शक ठरेल असे उद्गार जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी काढले. निसर्गयात्री या संस्थेच्यावतीने कोकणातील कातळशिल्पाची माहिती देणार्या पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी यांचे हस्ते पार पडले. रत्नागिरीमध्ये येणार्या पर्यटकांना रत्नागिरीत थांबविण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या पुस्तिकेसाठी कांचन डिजिटलचे कांचन मालगुंडकर यांनी कोकणातील शिल्पांचे चित्रण ड्रोन कॅमेर्यातून केले आहे. या कार्यक्रमाला उप जिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, प्रांताधिकारी अमित शेडगे, पुस्तिकेचे प्रमुख सुधीर रिसबुड, पुरातत्व अभ्यासक ऋत्विज आपटे, धनंजय मराठे, उदय लोध, कौस्तुभ सावंत व सुहास ठाकुरदेसाई आदीजण उपस्थित होते.
________________
www.konkantoday.com
________________
कोकणटुडे व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील व्हा
https://chat.whatsapp.com/K0I8GnYg9qHKtqaNeS63Oz