
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर होणार अधिक सुशोभित
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर अधिक सुशोभित करण्यात येणार असून नुकतीच वरिष्ठ अधिकार्यांनी संपूर्ण भागाची पाहणी केली.
अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, प्रांत डॉ. विलास सुर्यवंशी, तहसिलदार शशिकांत जाधव, रत्नागिरी पालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी सर्व परिसराची पाहणी करुन संपूर्ण विभाग अधिक स्वच्छ व सुंदर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार दुरूस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुमारे ७० कोटी रुपयांचा महसूल जमा होणार्या कार्यालय परिसरात स्वच्छता गृहाची सुविधा उपलब्ध नाही. बांधण्यात आलेले प्रशस्त स्वच्छतागृह तात्काळ सुरू करण्याचे आदेश सुशांत खांडेकर यांनी दिले आहेत.
सेतू कार्यालयातील पाठीमागील बाजूला वाढलेली झाडी जेसीबीच्या सहाय्याने काढून त्या ठिकाणी पार्किंगसाठी जागा केली जाणार आहे. मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. क्रेडाईचे अध्यक्ष नित्यानंद भुते, विरेंद्र वणजू, समीर सावत यांनी परिसर स्वच्छतेच्यादृष्टीने आवश्यक असणारे सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. www.konkantoday.com