अविष्कार कडून अनोख्या राखीची निर्मिती
रक्षाबंधनाच्या निमित्याने बाजारात नवीन नवीन प्रकाराच्या राख्या येत असतानाच रत्नागिरीतील आविष्कार शाळेने सीड राखी बनवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे
दरवर्षी नव्या नव्या रंगीबेरंगी येणाऱ्या राख्यांचे आकर्षण सर्वांनाच असते बहिणीही आपल्या भावांसाठी आकर्षक राख्या निवडत असतात या वर्षी अविष्कार संस्थेच्या शामराव भिडे कार्यशाळेने सीड राखेची निर्मिती करून एक अनोखी भेट दिली आहे रक्षाबंधनासाठी राखीचा वापर झाल्यानंतर ही राखी थोडावेळ पाण्यात भिजवून त्यानंतर कुंडीत किंवा मातीत कुस्करून टाकली असता त्यातून फळे व फुले यांचे झाडे उगविणार आहेत एकूणच ही राखी निसर्गाच्या संवर्धनास हातभार लावणार आहे मतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या अविष्कार शाळेने ही निर्मिती केली आहे यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले असून त्यासाठी त्यांना खास प्रशिक्षण देण्यात आले या राखीची संकल्पना माधुरी साळवे -कळंबटे यांची आहे
या राख्या खरेदी करून अनोखे रक्षाबंधन साजरे करावे असे आवाहन अधीक्षक सचिन वायंगणकर व अविष्कार परिवाराने केले आहे.दूरध्वनी : (०२३५२) २२८८५२, २२९५१७
www.konkantoday.com