
अभ्युदयनगर येथे घरफोडी साडेचार लाखांचा ऐवज लंपास
नाचणे अभ्युदयनगर येथील राहणारे जीवन वायंगणकर यांचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यामधील साडेचार लाख रुपयांचा ऐवज लांबविला.यातील वायंगणकर हे दहा दिवसांसाठी बाहेरगावी गेले होते ते घरी परतल्यावर त्यांना बंगल्याच्या खिडकीचे गज वाकलेले दिसले त्यानंतर त्यानी घरात पाहणी केली असता चोरटय़ांनी कपाट फोडून त्यामधील तीन लाखांचे दागिने एक लाखाच्या चांदीच्या वस्तू व पन्नास हजार रुपये रोख असा ऐवज लांबवल्याचे दिसून आले त्याबाबत त्यानी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com