वळणाचा अंदाज न आल्याने इको कार नदीत कोसळली
उक्षी येथे इको कार नदीत पडल्याने झालेल्या अपघातात गाडीचालक करूण मूर्ती हा गाडीसह बेपत्ता झाला. हे सर्वजण जिंदाल कंपनीत कामाला होते. उक्शी येथील धबधब्यावर ते सर्वजण गेले होते तेथून ते रत्नागिरीला परत येत असताना दुपारी हा अपघात झाला.वळणाचा अंदाज न आल्याने इको कार नदीत गेली. अपघातानंतर गाडीतील इतर जण बाहेर फेकले गेले चालक मूर्तीने सीट बेल्ट लावल्याने तो बाहेर पडू शकला नाही व गाडीसह वाहून गेला. गाडीमधील हेरंब कदम, अतुल करंदीकर, प्रसाद शिर्के, प्रशांत म्हात्रे, पराग पेडेकर या पाच जण वाचले.
www.konkantoday.com