
मुसळधार पाऊस व दरड आल्याने कोकण रेल्वे वाहतूकीवर परिणाम अनेक गाड्या रद्द तर काही गाड्या वळवल्या
कोकण रेल्वे मार्गावर आपटे जिथे येथे दरड कोसळल्याने ठप्प झालेली कोकण रेल्वेची वाहतूक अद्यापही सुरळीत झाले नाही ही दरड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे मुंबई परिसरात पडणारा मुसळधार पाऊस व दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे अनेक गाड्या थांबवण्यात आले आहेत काही गाड्या रत्नागिरी स्थानकात परत आणण्यात येत आहेत अनेक गाड्या कोकण रेल्वेने रद्द केले आहेत. त्यामध्ये मंगलोर- सीएसटीम एक्स्प्रेस,मडगाव- सीएसटीएम कोकणकन्या एक्सप्रेस,सावंतवाडी दादर तुतारी एक्सप्रेस,सावंतवाडी मडगाव पॅसेंजर,सीएसटीएम मडगाव मांडवी एक्सप्रेस, सीएसटीएम- मेंगळूर एक्सप्रेस,सीएसटीएम मडगांव कोकण कन्या एक्सप्रेस,नेत्रावती एक्सप्रेस,मत्सगंधा एक्सप्रेस,दुरांतो एक्स्प्रेस, कोचिवली एलटीटी एक्स्प्रेस,रत्नागिरी दादर पॅसेंजर.तसेच लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.तसेच काही गाड्या कमी अंतरापर्यंत धावणार आहेत.
पाऊस कमी होईपर्यंत या मार्गावरील कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णपणे सुरळीत होणार नाही.
www.konkantoday.com