मुलाशी लग्न झाल्याचा दावा करत अनधिकृत घरात राहणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
माझे तुमच्या मुलाशी लग्न झाले आहे असा दावा करत घरात अनधिकृतपणे राहणाऱ्या सोनिया विठ्ठल जमदाडे राहणार मुंबई हिच्या विरोधात चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रकाश विचारे राहणार मार्गताम्हाणे यांनी फिर्याद दिली असून यातील ही महिला आपल्या मुलाशी लग्न केल्याचा दावा करून गेले पंचवीस दिवस आपल्या घराच्या पडवीत राहात आहे. मात्र मुलाने असे कोणतेही लग्न केले नसल्याचे फिर्यादीचे म्हणने आहे. त्यामुळे त्यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली.
www.konkantoday.com