जेवण करता येत नाही म्हणून पत्नीचा छळ करणाऱ्या पती व अन्य तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जेवण करता येत नाही म्हणून पत्नीचा छळ करणाऱ्या गोवळकोट येथील मतीन उंडरे यांच्यासह अन्य तीन जणांवर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मतीन याची पत्नी फौजियाहीने याबाबत पोलीस स्थानकात फिर्याद दिल्यावर तिचा पती मतीन, सासू, नणद व मावस सासू यांच्यावर संगमताने छळाचा आरोप ठेवून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यांत आला आहे.
www.konkantoday.com