अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर
रत्नागिरी, दि. ४- ,रत्नागिरी जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी देखील अतिवृष्टीचा हाय अलर्ट लक्षात घेता जिल्हाधिकारी रत्नागिरी सुनील चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांना/महाविद्यालयांना दिनाक 5 ऑगष्ट रोजी सुटी जाहीर केली आहे.
www.konkantoday.com