विविध मागण्यांसाठी प्रोटॉनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बी. के. पालकर यांचे धरणे आंदोलन
रत्नागिरी ः राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघामार्फत, प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अर्थात प्रोटॉनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष बी. के. पालकर यांनी धरणे आंदोलन केले. शासन कर्मचारी विरोधी कायदे करत असून त्याच्याविरोधात व प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतकर कर्मचारी यांच्या विविध मागण्या प्रलंबित असून त्याबाबत शासनाने निर्णय घ्यावा यासाठी हे उपोषण करण्यात आले.
www.konkantoday.com