
पाचल तालुक्यातील काजिर्डा शाळेला शिक्षकच नाही
राजापूर ः शासनाकडून एकीकडे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा त्या त्या भागात मिळाव्यात असे प्रयत्न सुरू असतानाच जिल्ह्यातील अनेक भागात इमारतीपासून शिक्षकांपर्यंत अनेक समस्या आहेत. पाचल येथील काजिर्डा शाळा नं. २ या शाळेत विद्यार्थी येत असून या शाळेत अजून एकही शिक्षक नसल्याने या विद्यार्थ्यांनी शिक्षण कसे घ्यावयाचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे इतर ठिकाणी शाळा सुरू होवूनही काजिर्डा शाळेतील विद्यार्थी शिक्षकांपासून वंचितच असल्याने ग्रामस्थानी आठ दिवसात शिक्षक न दिल्यास १५ ऑगस्टपासून पंचायत समितीसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
www.konkantoday.com