पर्यटन व सृष्टी नेचर क्लबचे अध्यक्ष सुरेंद्र माने दुचाकीने ६ हजार कि.मी. प्रवास करणार

रत्नागिरी ः देवरूख-साडवली येथे राहणारे कोकण पर्यटन व सृष्टीनेचर क्लबचे अध्यक्ष सुरेंद्र माने हे देवरूख ते लडाख असा ६ हजार कि.मी. चा प्रवास दुचाकीने करणार आहेत. सुरेंद्र माने हे लेह लडाख येथे जावून जवानांच्या गाठीभेटी घेणार आहेत. तसेच जम्मू काश्मिरला शांतता प्रस्थापित व्हावी हा संदेश घेवून तेथील जवानांसाठी देवरूखवासियांनी दिलेल्या राख्या जवानांना सुपूर्द करणार आहेत. सुरेंद्र माने याआधी आपल्या सहकार्‍यांसोबत दुचाकीवरून अशाच तीन मोहिमा फत्ते केल्या आहेत. उद्या त्यांना देवरूखवासियांच्यावतीने शुभेच्छा देण्यात आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button