
डाळ वड्यात प्लॅस्टिक सापडले कंत्राटदाराला एक लाखाचा दंड
मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाने अधिकृत कॅटरिंग सर्व्हिसकडून डाळवडा खरेदी केला असता त्यामध्ये प्लॅस्टिकचे तुकडे सापडले होते व हा वडा खाल्ल्याने दोन वर्षांचा मुलगा अस्वस्थ झाला होता या ठेकेदाराविरुद्ध प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली होती त्याची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने साई केटरिंग सर्व्हिसला एक लाखाचा दंड ठोठावला आहे व अशी घटना परत घडल्यास परवाना रद्द करण्याची तंबीही प्रशासनाने दिली आहे
काही दिवसांपूर्वी मत्सगंधा एक्सप्रेसमधून सचिन शिंदे हे आपल्या दोन वर्षांच्या छोट्या मुलासह प्रवास करीत होते त्यावेळी त्यांनी खेड स्थानकाच्या दरम्यान गाडीतील अधिकृत केटरिंग कडून मुलांसाठी डाळवडा घेतला तो मुलाने खाल्ला असता त्यामध्ये प्लॅस्टिकचे तुकडे आढळून आले तेवढी शिंदे यांनी त्या विक्रेत्याला बोलावून जाब विचारला तसेच ठेकेदारालाही बोलवण्यात आले परंतु त्या सर्वांनी उडवा उडवीची उत्तरे दिली या छोट्या मुलाला रत्नागिरीत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी त्याने केलेल्या उलट्या मधूनही प्लॅस्टिकचे तुकडे मिळाले होते ही गंभीर बाब असल्याने मुलांचे वडील शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती त्याची दखल घेत प्रशासनाने कंत्राटदाराला दंड ठोठावला आहे.
www.konkantoday.com