
उधाणाच्या भरतीने नुकसान रोखण्यासाठी मोठे दगड, टेट्रापॉड टाकणार-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
रत्नागिरी दि.३:- उधाणाच्या भरतीमुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी मुरुगवाडा, पंधरामाड आणि मिऱ्या बंदर येथे मोठे दगड आणि टेट्रापॉड टाकण्यात येतील असे आश्वासन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी येथील नागरिकांना दिले.
मुरुगवाडा,पंधरमाडा, मिऱ्या बंदराची पहाणी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज रत्नागिरी प्रांतधिकारी अमित शेडगे, तहसिलदार शशिकांत जाधव, पत्तन अभियंता बी.ए. शिंदे, सहाय्यक पतन अभियंता एस.ए. हुनरेकर, कनिष्ठ अभियंता एस. ए. चौधरी, आशिष गराडे, मुख्याधिकारी, रत्नागिरी प्रशांत ठोंबरे तसेच मुरुगवाडा, पंधरामाडा येथील ग्रामस्थ यांच्यासमवेत केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी येथील ग्रामस्थांशी चर्चा केली.
जिल्हाधिकारी म्हणाले समुद्रांच्या लाटांमुळे व जोरदार पाऊसामुळे जेथे नुकसान झाले आहे तेथे महामार्ग चौपदरीकरणामधील कामात उपलब्ध होणारे मोठे मोठे दगड त्या ठिकाणी टाकण्याच्या सुचना त्यांनी कार्यकारी अभिंयता तसेच महामार्गाचे काम करणाऱ्या संबधित दिल्या. यामुळे येथील नागरिकांच्या घराना धोका कमी होईल. जिल्हाधिकारी म्हणाले येथील ग्रामस्थांशी चर्चा केली असता नगरपालिकेने तयार केलेला येथील रस्ता टिकण्याच्या दृष्टीने येथे संरक्षक भिंत सोबतच बाहेरच्या बाजुला टेट्रापॅड टाकले तर रस्ता सुरक्षित राहील. मुरुगवाडा येथे सरंक्षक भिंत नाही ती बांधण्यात येऊन सोबतच टेट्रापॅड टाकण्यात येतील असे आश्वासन त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिला.
परंतु या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा म्हणून पालकमंत्री यांच्या प्रयत्नातून या येथील कामासाठी 190 कोटी चे काम मंजूर झालेले आहे. हे काम करत असताना येथील नागरिकांच्या घरांना समुद्रांच्या लाटांमुळे धोका पोहणार नाही याची काळजी घेतली जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.
www.konkantoday.com