शाळेच्या परिसरात साफसफाई करणाऱ्या शिक्षकाला साप चावला
संगमेश्वर तालुक्यातील ओझरखोल येथे शाळेच्या परिसरात साफसफाई करताना एका शिक्षकाला साप चावल्याची घटना घडली आहे.
ओझर खुर्द येथील राहणारे चंद्रशेखर प्रभाकर सरदेशपांडे हे शाळेत शिक्षक आहेत ते शाळेच्या परिसरात सकाळी साफसफाई करत असताना त्यांना सापाने दंश केला. सरदेशपांडे यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
www.konkantoday.com