
31 ऑगस्ट 2024 पासून म्हणजेच गणेश चतुर्थी पूर्वी सिंधुदुर्ग पुणे विमान सेवेला शुभारंभ होणार
गणपतीला कोकणा जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेता फ्लाय 91 या विमान कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 31 ऑगस्ट 2024 पासून म्हणजेच गणेश चतुर्थी पूर्वी सिंधुदुर्ग पुणे विमान सेवेला शुभारंभ होणार आहे. पुण्यातून सिंधुदुर्गात म्हणजेच चिपी विमानतळावर आता तासाभरात पोहोचता येणार आहे. आठवड्यातून दोन वेळा विमान फेरी ठेवण्यात आली आहे. शनिवारी सकाळी पुण्या वरून 8.05 ला विमान सुटून 9.10 वाजता सिंधुदुर्गला पोहोचेल. तर सिंधुदुर्ग येथून 9.30 ला सुटून 10.35 ला पुणे येथे पोहोचेल अशी माहिती, विमानसेवा देणाऱ्या फ्लाय 91 कंपनीने आपल्या अधिकृत साइटवर प्रवाशांना देण्यात आली आहे. त्यामुळे चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे कोकणात सिंधुदुर्गात जाण्यासाठी मुंबईहूनही विमान सेवा आहे. आता पुण्यातूनही ही सेवा सुरू झाल्याने चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईतून चिपी बरोबरच गोव्यासाठी ही विमान जातात. त्यामुळे जर चिपीचे तिकीट उपलब्ध नसेल तर अनेक जण गोव्याला जावून कोकणात येणे पसंत करतात. आता त्यांना आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यानुसार पुण्यातून ते एका तासात कोकणात जावू शकतात. गणपतीत खाजगी गाड्यांच्या तिकीटाचे दर हे गगनाला भिडलेले असतात. त्यामुळे विमानाने जाणे अधिक जण पसंत करतील अशी आशा व्यक्त केली जात आहे