दोनशे युनिटपर्यंत वीज बिल माफ,आ.पची दिल्लीकरांना भेट
नवीदिल्ली
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या आम आदमी पक्षाच्या सरकारने दिल्लीकरांना आज मोठी भेट दिली. दिल्लीकरांना 200 युनिटपर्यंत वीज बील माफ करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने जाहीर केला आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. नव्या निर्णयानुसार, दिल्लीकरांना 200 युनिटपर्यंत वीज मोफत मिळणार आहे. 201 ते 400 युनिटपर्यंतच्या वीज बिलावर 50 टक्के अनुदान मिळणार आहे. ही 50 टक्के सवलत बिलाच्या रकमेवर नव्हे, तर वीज वापराच्या युनिटवर मिळणार आहे. म्हणजेच, एखाद्यानं 300 युनिट वीज वापरल्यास त्याला 150 युनिटसाठी पैसे मोजावे लागणार आहेत.