
करमणूक कर चुविकला म्हणून केबल चालकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी ः जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केबल व्यवसाय सुरू करण्याची परवानगी घेतल्यानंतर दोन वर्षाच्या कालावधीत करमणूक कराची रक्कम भरणा केली नाही. म्हणून विजय यादव (रा. जाकिमिर्या) यांच्याविरूद्ध पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यादव हे या भागात केबलचा व्यवसाय करतात मात्र शासनाकडे भरावयाची मनोरंजनाच्या कराची रक्कम त्यांनी भरली नसल्याने याबाबत करमणूक विभागाकडून पोलिसांकडे तक्र्रार करण्यात आली.
www.konkantoday.com