
कंपनीत काम करणाऱ्या कामगाराला सर्पदंश
राजापूर तालुक्यातील ताम्हाणे येथील कंपनीत काम करणाऱ्या तरुणांना सापाने दंश केल्याची घटना घडली आहे.
येथील पितांबरी कंपनीत संदेश अमृते हा तरुण कामाला आहे. काल तो कंपनीत साफसफाईचे काम करीत असताना अचानक त्याला सापाने दंश केला. त्याला सुरुवातीला रायपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले तेथून जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
www.konkantoday.com