आमदार राजन साळवी यांच्या पाठपुराव्यामुळे चिंचुर्टी रस्त्यावरील मोरीची दुरूस्ती
लांजा ः तालुक्यातील चिंचुर्टी येथे जाणार्या मुख्य रस्त्यावरील धावडेवाडी येथील मोरी अचानक खचल्यामुळे हा रस्ता वाहतुकीला धोकादायक झाला होता. या रस्त्यावरून अनेक विद्यार्थ्यांना शाळेसाठी तर नागरिकांना कामासाठी एस.टी.ने प्रवास करावा लागत होता परंतु हा भाग धोकादायक झाल्याने एस.टी.ने या मार्गावरील वाहतूक थांबविली होती. आ. राजन साळवी यांनी या प्रकरणात लक्ष घालून तातडीने मोरी दुरूस्तीचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे आता सार्वजनिक बांधकाम विभागाने ही मोरी दुरूस्ती करून हा रस्ता वाहतुकीला खुला केला आहे.
www.konkantoday.com