
रत्नागिरीत होणार फॉरेन्सिक लॅब – उदय सामंत
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्यातील पोलिसांना मोठ्या गुन्ह्यांचे पुरावे त्वरीत मिळावेत ह्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात खेडशी येथे फॉरेन्सिक लॅब होणार असल्याची माहिती म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली.ह्या प्रयोगशाळेमुळे मोठया गुन्ह्यांचा तपास त्वरीत होऊन आरोपींविरुद्धचे पुरावे सक्षम व्हायला मदत होणार आहे. ह्यासाठी शासनाने १.६२ कोटी मंजूर केले होते.
ह्या प्रयोगशाळेचे उद्घघाटन पालकमंत्री ना.रवींद्र वाईकर,म्हाडा अध्यक्ष ना.उदय सामंत,खासदार विनायक राऊत, खासदार सुनील तटकरे तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार , महासंचालक तांत्रिक पोलीस हेमंत नागराळे , जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण,पोलीस अधिक्षक प्रवीण मुंडे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
www.konkantoday.com