बीएसएनएल, आयडीया, वोडाफोसह जिल्ह्यातील मोबाईल व इंटरनेट सेवा कोलमडली
रत्नागिरी ः गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील बीएसएनएलची फोनसेवा, आयडीया, वोडाफोन आदी कंपन्यांची मोबाईल सेवा कोलमडली असून त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. या कंपन्यांची नेटवर्क कोलमडल्यामुळे ग्राहकाला पैसे भरुनही सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे. आयडीया, वोडाफोन आदी कंपन्यांचे गेल्या दोन तीन महिन्यांपासून नेटवर्क कोलमडले आहे. त्यामुळे दापोली, खेड, चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, देवरूख आदी भागातील या कंपन्यांच्या ग्राहकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. संपर्काचे साधनच नसल्यामुळे या ग्राहकांना इतरांशी संपर्क साधण्यास अडचणी होत आहेत.याबाबत कंपन्यांकडे तक्रार करूनही कंपनीकडून मात्र त्याची विशेष दखल घेतली जात नसल्याने ग्र्राहक हैराण झाले आहेत. एकीकडे खाजगी कंपन्यांची अशी अवस्था असतानाच सरकारच्या बीएसएनएलचाही कारभार या पद्धतीनेच चालू आहे.
जिल्ह्यातील विविध तालुक्यातील बीएसएनएलचे फोन बंद आहेत. याचा विशेष फटका मंडणगड, खेड, दापोली आदी भागाला बसला आहे. ग्राहक तक्रार करूनही कंपन्या त्याची दखल घेत नसल्याने आता ग्राहक ग्र्राहकमंचात तक्रार करण्याच्या तयारीत आहेत.
www.konkantoday.com