प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकार्यांची कमतरता दूर करण्यासाठी आरोग्य सभापती विनोद झगडे यांनी पावले उचलली
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकार्यांची कमतरता असल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. ग्रामीण भागातील लोकांना त्यामुळे शहराकडे धाव घ्यावी लागते. रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा रूग्णालय, ग्रामीण व उपजिल्हा रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आदी ठिकाणी वैद्यकीय अधिकार्यांची पदे रिक्त आहेत. यामुळे अशा ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने ही पदे भरण्यासाठी इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून त्यासाठी तशी जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यामुळे लवकरच अशा आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकारी उपलब्ध होतील असा विश्वास जि.प.चे आरोग्य अधिकारी विनोद झगडे यांनी व्यक्त केला आहे.
www.konkantoday.com