
पुरूषोत्तम नाट्यस्पर्धा २७ व २८ सप्टेंबरला रत्नागिरीत
रत्नागिरी ः महाविद्यालयीन युवक व युवतींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पुरूषोत्तम करंडक स्पर्धेचे आयोजन केले जाते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड या तिन्ही जिल्ह्यातील महाविद्यालयांसाठी प्राथमिक फेरीचे आयोजन रत्नागिरी येथे दि. २७ व २८ सप्टेंबर रोजी सावरकर नाट्यगृहात करण्यात आले आहे. रत्नागिरी केंद्राबरोबरच पुणे, कोल्हापूर, नागपूर व जळगांव या केंद्रावरही प्राथमिक फेरीचे आयोजन केले जाते. त्यानंतर पुणे येथे डिसेंबर महिन्यात होणार्या अंतिम फेरीत प्रत्येक केंद्रातील पहिल्या चार यशस्वी संघांना प्रवेश दिला जातो. या स्पर्धेत जास्तीत जास्त महाविद्यालयांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
www.konkantoday.com