
जिल्ह्यातील चार मतदारसंघांवर काँग्रेसचा दावा
राजापूर ,दापोली, चिपळूण ,रत्नागिरी हे चार विधानसभा मतदार संघावर काँग्रेसने दावा केला आहे .हे चार विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावेत अशी आघाडीच्या बैठकीत मागणी करू असे काँग्रेस पक्षाचे निरीक्षक रमाकांत म्हात्रे व तौफिक मुल्लाणी यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलताना दिली रत्नागिरीतील काँग्रेस भवनमध्ये विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती त्यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी दाखल करणाऱ्यांमध्ये राजापूर येथून अधिक उमेदवार इच्छुक आहेत. राजापूर येथून अजित यशवंतराव, अविनाश लाड, आनंद भडेकर, विजय खामकर ,राजेश राणे, सदानंद कामगार, महंमद अली वाघू व संजय आयरे हे इच्छुक उमेदवार आहेत. तर दापोली येथून मुश्ताक मिरकर व रत्नागिरी येथून दीपक राऊत यांनी उमेदवारी मिळण्यासाठी अर्ज केले आहेत. चिपळूण येथून इब्राहिम दलवाई व अशोक जाधव या दोघांनी अर्ज केले आहेत. हे सर्व अर्ज काँग्रेसच्या राज्य निवड समितीकडे पाठवण्यात येणार असून सात ऑगस्ट रोजी होणाऱ्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे.
www.konkantoday.com