जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या अध्यक्षपदी बळीराम मोरे यांची निवड
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्या. या संस्थेच्या अध्यक्षपदी बळीराम जयराम मोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या निगराणीखाली ही निवडणूक एस. एस. पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी प्रलंबित सभासद कर्ज मर्यादा वाढवून ४० लाख रुपयांपर्यंत करण्याचा तसेच सभासद कुटुंब सहाय्य निधीची रक्कम पाच लाखापर्यंत करण्याचा तसेच सभासदांना एटीएम व विमा सुरक्षिता देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
www.konkantoday.com