
आरटीओमध्ये बनावट इन्शुरन्स पॉलिसीचा वापर केल्याप्रकरणी दोनजणांना अटक
रत्नागिरी ः रत्नागिरी येथील आरटीओ कार्यालयात वाहन नुतनीकरणासाठी बनावट इन्शुरन्सचा वापर केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी नरेंद्र दत्तात्रय विचारे (रा. हातखंबा) व अस्लम अब्बास बोरकर (रा. कर्ला) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या दोघांनी इन्फोटोकीयो या कंपनीच्या मोटार वाहन इन्शुरन्सशी बनावट पॉलीसी वापरून वाहनाचे नुतनीकरण केले होते. याध्ये इन्शुरन्स कंपनीची फसवणूक झाली होती. यामुळे इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी सिद्धेश आळले यांनी या दोघांविरूद्ध पोलीस स्थानकात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या दोघांविरूद्ध कारवाई केली.
www.konkantoday.com