आजपासून मच्छिमारी करण्यास शासनाची परवानगी
रत्नागिरी ः पावसाळ्याच्या काळात मच्छीचा प्रजननाचा काळ असल्यामुळे शासनाने ३१ जुलैपर्यंत मच्छिमारीसाठी बंदी केली होती. ही बंदी काल संपली असून आजपासून मच्छिमार समुद्रात मच्छिमारीसाठी जावू शकणार आहेत. एकूणच बंदीच्या काळात मच्छिमारी करणार्यांवर मत्स्य विभागाने कारवाई केल्या. जिल्ह्यातील एकूण १४ नौकांवर सहाय्यक मत्स्य विभागाने कारवाई करून त्यांनी पकडलेली मासळी जप्त केली. याशिवाय मासळीच्या किंमतीच्या पाचपट दंडही वसूल केला. या नौकाधारकांकडून दंडापोटी ३ लाख ५१ हजार रुपये वसूल करण्यात आले. सहाय्यक मत्स्य संचालक आनंद पालव, तृप्ती जाधव, रश्मी आंबुलकर, श्री. देसाई आदींच्या पथकाने बेकायदेशीर मच्छिमारी करणार्या नौकांवर कारवाई केली.
www.konkantoday.com