अमावास्येला आलेल्या समुद्राच्या उधाणाने मिर्या संरक्षण बंधार्याचा शिल्लक भागही वाहून गेला
रत्नागिरी ः मिर्यावासीयांना जी भीती वाटत होती ती भीती काही प्रमाणात खरी ठरली असून काल झालेल्या अमावास्येने समुद्राला आलेल्या मोठ्या उधाणामुळे व त्यातून आलेल्या अजस्त्र लाटांनी १५ माड येथील धुपबंधार्याचा उरला सुरला भागही गिळंकृत केला. त्यामुळे आता १५-२० फुटीच्या रस्त्यापैकी एका भागात ३ ते ४ फुटाचाच रस्ता शिल्लक राहिला आहे. शासनाकडून यावर दरवर्षी लाखो रुपये खर्ची करून पैशाची धूप केली जात असली तरी मिर्यावासियांचा जमिनीची धूप होण्याचा मूळ प्रश्न अद्यापही मार्गी लागत नाही. अमावास्येच्या समुद्राच्या उधाणाच्या भीतीने मिर्यावासियांनी रात्र जागूनच काढली. आता या बंधार्यावर परत एकदा थातुरमातुर डागडुजी सुरू करण्यात आली आहे.
www.konkantoday.com