
रत्नागिरी शहरात उद्या पेट्रोल उपलब्ध होणार
रत्नागिरी ः रत्नागिरी शहरातील पेट्रोलपंप सध्या पेट्रोल संपल्यामुळे बंद आहेत. परंतु आता परिस्थितीत सुधारणा होत असून मिरज येथील डेपोमधून टँकर सुटले आहेत. मिरज येथील डेपोपर्यंत जाण्यासाठी कराड येथूनही मार्ग आता उपलब्ध झाला आहे. आंबा घाटातूनही अत्यावश्यक सेवांना प्राधान्य देण्याचे धोरण जिल्हाधिकारी यांनी ठेवले आहे. याशिवाय वाशी येथील डेपोमधूनही पेट्रोलचे टँकर येत आहेत. त्यामुळे हे टँकर उद्यापर्यंत रत्नागिरीत पोहोचल्यानंतर रत्नागिरीतल्या सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल उपलब्ध होईल असे महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध तसेच गांधी पेट्रोल पंपाचे जयुशेठ गांधी यांनी सांगितले. त्यामुळे रत्नागिरीकरांची पेट्रोल टंचाई उद्या दूर होईल असा अंदाज आहे.
www.konkantoday.com




