
शिल्पाताई पटवर्धन बालमेरच्या संचालक
रत्नागिरी ः रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या शिल्पाताई पटवर्धन यांची भारत सरकारच्या बालमेर लावरी ऍण्ड कंपनीच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीच्या संचालकपदी नियुक्त होण्याचा कोकणाला प्रथमच मान त्यांच्या रूपाने मिळाला आहे.
श्रीमती पटवर्धन या अनेक वर्षे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत. यापूर्वी त्यांची महिला विभागाच्या महाराष्ट्रासह पाच राज्यांच्या प्रमुखपदी त्यांची नियुक्ती झाली होती. आता केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाच्या अखत्यारित येणार्या बालमेर कंपनीच्या संचालकपदी निवड झाल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
www.konkantoday.com