वैश्य समाजाचा जातपडळताळीचा मार्ग मोकळा
रत्नागिरी ः जात पडताळणीसाठी वैश्यवाणी आणि वाणी या प्रश्नावरून तांत्रिक मुद्दा उपस्थित होत असल्याने वैश्य समाजातील अनेक मुलांना जात पडताळणीच्या वेळी मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत होते परंतु आता वैश्यवाणी आणि वाणी हे वेगळे नसून दोघेही एकाच जातीसाठी असल्याचे मत सामाजिक न्याय व कामगार कल्याणमंत्री कुंटे यांनी दिली असून याबाबतचे तातडीने परिपत्रक काढून अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. वैश्य समाजाचे नेत्यांनी नुकतीच मा. कुंटे यांची भेट घेवून या समस्येवर मार्ग काढावा असे आवाहन केले होते. या बैठकीला वैश्य समाजाचे नेते माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, वैश्य समाजाचे रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष विकास शेट्ये, उद्योजक विभास खातू, ऍड. रूपेश गांगण, वैश्य समाज सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष बाळा बोर्डेकर आदीजण उपस्थित होते.
www.konkantoday.com