राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी केला भाजपामध्ये प्रवेश

मुंबई : भाजपमध्ये आज (31 जुलै) मेगाभरती पार पडली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य मधुकर पिचड , त्यांचे सुपुत्र वैभव पिचड , साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले , मुंबईच्या वडाळा येथील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर , नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक आणि राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह अनेक दिग्गजांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button