मुंबई-गोवा चौपदरीकरणाच्या कामापैकी १४५ कि.मी. मार्गाचे कॉंक्रीटीकरण पूर्ण
रत्नागिरी ः कोकणवासियांच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण करण्याची तयारी राष्ट्रीय महामार्गाकडून केली जात आहे. एकूण ३६६ कि.मी.च्या मार्गापैकी १४५ कि.मी. मार्गाचे कॉंक्रीटीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता विनयकुमार देशपांडे यांनी दिली आहे.
या कॉंक्रीटीकरणामुळे सिंधुदुर्गात जवळजवळ १०० कि.मी. मार्गाचे कॉंक्रीटीकरण झाले असून रत्नागिरी जिल्ह्यात मात्र त्याचा वेग मंद आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेडमध्ये २७ कि.मी. तर रायगडमध्ये इको सेन्सेटीव्ह झोनमध्ये अडसर झाल्याने तेथे १५ कि.मी. मार्गाचे कॉंक्रीटीकरण झाले आहे. या महामार्गाकरिता ज्या लोकांच्या जमीन संपादीत करण्यात आल्या होत्या त्या शेतकर्यांना भूसंपादनाची रक्कम साडेतीन हजार कोटी रुपये देण्यात आली असून अजूनही ५०० ते ६०० कोटी रुपये भूसंपादनापोटी द्यावयाचे राहिले आहेत. आगामी गणपती उत्सवासाठी येणार्या चाकरमान्यांना या मार्गावर कोणतीही अडचण येवू नये यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग सतर्क राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
www.konkantoday.com