![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2019/07/SmartSelect_20190731-132609_Facebook.jpg)
‘भाजपमध्ये प्रवेश देणे आहे’ चे पोस्टर सिंधूर्गात झळकले
विधानसभेच्या तोंडावर संपूर्ण महाराष्ट्रात सध्या भारतीय जनता पार्टी व शिवसेनेमध्ये येण्यासाठी चढाओढ पाहताना दिसते आहे.नुकतेच राष्ट्रवादीतील बडय़ा नेत्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.अशा पक्ष प्रवेशावर टीका करण्यासाठी पोस्टरबाजी करण्यात येत आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा गावांमध्ये सुद्धा पोस्टरबाजी करण्यात आली आहे.शिरोडा गावांमध्ये अज्ञातानी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश देणे आहे अशा मजकुराचे पोस्टर सर्वत्र लावले.तसेच या पोस्टरवर नियम व अटी यांच्यामध्ये ईडी व इन्कम टॅक्स नोटीस असलेल्यांना प्राधान्य,भ्रष्टाचाराचा अनुभव असलेल्याना पहिली पसंती,सहकार क्षेत्र बुडवल्याचा अनुभव हवा अशा प्रकारचा मजकूर देखील त्यावर आहे. तसेच टीप म्हणून विचारधारेची कुठले अट नाही असे देखील लिहिले आहे.त्यामुळे अशा प्रकारचे पोस्टर कुणी लावले याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. अशा प्रकारचे पोस्टर्स सर्वप्रथम पुण्यामध्ये हडपसर मध्ये लावण्यात आले होते.
www.konkantoday.com