ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेच्या अनेक भागात गळती
रत्नागिरी ः ग्रामीण भागातील जनतेसाठी मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या अनेक भागात आता गळती सुरु झाली आहे. मुसळधार पावसामुळे या इमारतीच्या भिंती पूर्णपणे ओल्या झाल्या आहेत. याशिवाय टेरेसवर जाणारा मुख्य दरवाजा तुटलेल्या अवस्थेत असल्याने त्यातून पावसाचे पाणी जिन्यातून पूर्णपणे खाली येत असल्याने जिन्याच्या पायर्या बुळबुळीत झाल्या असून यामुळे या पायर्यांवरून कामासाठी आलेल्या लोकांना कसरत करत ये-जा करावी लागत आहे. याबाबत वरिष्ठ अधिकार्यांनी तातडीने कार्यवाही करावी अशी जनतेची मागणी आहे.
www.konkantoday.com