
खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता
रत्नागिरी ः रत्नागिरी तालुक्यातील वैद्यलावगण येथील विठ्ठल धनावडे याचा खून केल्याच्या आरोपावरून संतोष कृष्णा बळकटे यांची संशयाचा फायदा देवून निर्दोष मुक्तता झाली. यातील आरोपी संतोष बळकटे याचे विठ्ठल धनावडे याच्याशी वाद होता. या वादातून त्याने २६ मे २०१७ रोजी विठ्ठल याचा लाकडी दांडा व लोखंडी प्रहाराने खून केला होता. या खटल्याची सुनावणी होवून वैद्यकीय पुराव्यातील विसंगती व साक्षीदारांच्या उलट तपासातील विसंगतीमुळे संशयाचा फायदा देवून आरोपीची खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपीच्या वतीने ऍड. सुर्वे यांनी काम पाहिले.
www.konkantoday.com