उड्डाणपुलाची मागणी मान्य करा अन्यथा मंत्रालयाच्या वरच्या मजल्यांवरून उडी घेऊ ,पाग वासियांची आक्रमक भूमिका

चिपळूण येथे महामार्ग चौपदरीकरणांतर्गत मंजूर झालेल्या शहरातील उड्डाणपुलाची लांबी वाढवावी या मागणीसाठी पाग वासीय आक्रमक झाले आहेत. त्यांनी एका पत्राद्वारे असा इशारा मुख्य अभियंता कोकण भवन यांना दिला आहे.याबाबत माजी बांधकाम सभापती संजय तांबडे यांनी सांगितले की या मागणीसाठी प्रशासन सकारात्मक आहे. वाढीव पुलाचे१४८कोटी रुपयांचे वाढीव अंदाजपत्रक शासनाला सादर करण्यात आले होते. तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे .यामुळे आमची वाढीव पुलाची मागणी शासनाने तात्काळ मंजूर करावी अन्यथा थेट मंत्रालयात जाऊन वरच्या मजल्यावरून उडी घेऊ असा इशारा पागवासियांनी दिला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button