
सिंधुदुर्ग राष्ट्रवादीत नाराजी नाट्य सुरू
कुडाळ :-सिंधूर्गात जिल्हाअध्यक्ष बदलानंतर नाराजी नाट्य सुरू.सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश गवस यांना जिल्हाध्यक्ष पदावरून तडकाफडकी बाजूूला करत प्रदेश चिटणीसपदी त्यांना बढती देण्यात आली. मात्र, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसला विश्वासात न घेता हा निर्णय घेतला गेल्यामुळे सुरेश गवस यांनी ते पद नाकारले. विशेष म्हणजे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या या निर्णयामुळे जिल्हातील राष्ट्रवादीच्या जवळपास ५२ प्रमुख पदाधिकार्यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. आता येत्या दोन दिवसात पक्षाच्या सदस्यत्वाच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सुरेश गवस यांनी दिली.आम्ही राष्ट्रवादीचे प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून सुरुवातीपासून संघटनेत काम केले. मात्र, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसला डावलून जिल्हाध्यक्ष पदाबाबत प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाध्यक्ष पदावरून मला तडकाफडकी बाजूला करण्याचा निर्णय घेतल्याने सिंधुदुर्गातील राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्ते नाराज झाले आहेत व चोऱ्यांमुळे त्यांनी राजीनामे दिले.
www.konkantoday.com