
भारतातील सर्वात उंच व्यक्ती असल्याचा दावा करणाऱ्या धर्मेंद्र प्रताप सिंग यांचं समाजवादी पक्षात प्रवेश
भारतातील सर्वात उंच व्यक्ती असल्याचा दावा करणाऱ्या धर्मेंद्र प्रताप सिंग यांनी शनिवारी समाजवादी पक्षात प्रवेश केला. धर्मेंद्र प्रताप सिंग उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमधून असून त्यांची उंची २.४ मीटर म्हणजेच ८ फूट १ इंच इतकी आहे.वर्ल्ड रेकॉर्डसाठी त्यांची उंची ११ इंचाने कमी आहे. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल यांनी धर्मेंद्र प्रताप सिंग यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा केली. त्यांच्या प्रवेशामुळे विधानसभा निवडणुकीत पक्षाला बळ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केली.
www.konkantoday.com