
पावसाळी पर्यटनाला चालना देण्यासाठी जिद्दी माऊंटेनिअर्सची किल्ले ट्रेकींग मोहीम
रत्नागिरी ः कोकणातील पावसाळी पर्यटनाच्या वृद्धीसाठी जिद्दी माऊंटेनिअर्सनी पाऊल उचलले असून कोकणात असलेले किल्ले पावसाळ्यात पर्यटकांना पाहता यावेत यासाठी मान्सून किल्ले ट्रेकींग हा उपक्रम हाती घेतला आहे. हा उपक्रम सप्टेंबर महिन्यापर्यंत चालणार असून कोकणातील बहुतांश किल्ल्यावर जिद्दी माऊंटेनिअर्सतर्फे ट्रेक नेण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष धिरज पाटकर यांनी दिली आहे. २५ ऑगस्ट रोजी रांगणा, १५ सप्टेंबर रोजी पनवेलजवळील कलावंतीण दुर्ग, २२ सप्टेंबर रोजी भैरवगड, २१ व २२ सप्टेंबर रोजी मेगाट्रेक आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये पन्हाळगड, पावनखिंड, विशाळगड, माचाळ अशी ऐतिहासिक मोहीम घेण्यात आली आहे.
www.konkantoday.com