
किल्ले सिंधुदुर्ग येथील जेटीचा खालील भाग पोकळ बनला
किल्ले सिंधुदुर्ग येथील जेटीचा खालील भाग पोकळ बनला असून येथे जेटी खचून धोकादायक बनली आहे. जेटीच्या खालील भरावाचे दगड निखळले असूनयामुळे ओहोटीच्या वेळी जेटीकडे किल्ला प्रवासी होड्या लावणे मुश्किल बनले असून शुक्रवारी सायंकाळी 4 वा.पासून याच कारणास्तव किल्ला होडी सेवा बंद ठेवावी लागली. तसेच किल्ला जेटी तसेच मालवण बंदर जेटीकडे मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने होडी व्यावसायिकांना अनेक अडचणी येत आहेत. याबाबत लेखी तक्रारी देऊनही बंदर विभाग लक्ष देत नसल्याने किल्ला प्रवासी होडी व्यवसायिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.




