
भाजपा प्रवेशाचे वादळ रत्नागिरी जिल्ह्यातही येणार?
रत्नागिरी ः आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी व कॉंग्रेसमधील अनेक आमदार, माजीआमदार भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छूक असून अनेकजण संपर्कात असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली असतानाच या भारतीय जनता पक्षाच्या प्रवेशाचे वातळ रत्नागिरी जिल्हयातही घोंगावणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील असलेल्या आमदारांपैकी काहीजण भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात असून येत्या काही दिवसात हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता दिसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपची ताकद नसली तरी देशात व महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढत चालली असून त्यामुळे भाजपच्या वाढत्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील काही आजी आमदार तर काही माजी आमदार व पदाधिकारी इच्छूक आहेत. भारतीय जनता पक्षातूनही उमेदवाराची असलेली ताकद व निवडून येण्याची क्षमता या गोष्टींचाही विचार करूनच त्यांना प्रवेश देण्यात येत असल्याने जोपर्यंत भाजपाकडून हिरवा कंदील मिळत नाही तोपर्यंत सावधानतेची भूमिका या मंडळींकडून देण्यात येत असली तरी येत्या काही दिवसातच मात्र त्याबाबत धक्कादायक घडामोडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
www.konkantoday.com