
जिल्हा परिषदेत ५, पंचायत समितीत २ स्वीकृत सदस्य नियुक्त करा, महसुलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांची मागणी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत ५ आणि पंचायत समिती २ स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याची मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे नागपूरच्या दौर्यावर आहेत. तिथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी वरील मागणी केली. ते म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करण्याची मागणी केली आहे. ज्या पद्धतीने महापालिका, नगरपालिकेत स्वीकृत सदस्य असतात त्याप्रमाणे जिल्हा परिषदेत ५ स्विकृत सदस्य आणि पंचायत समित २ स्विकृत सदस्य असले पाहिजेत. ज्याला आपण कोऑप्ट म्हणतो. त्यानुसार मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली.www.konkantoday.com




