गणपतीपुळे येथे मालगुंड रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

रत्नागिरी ः पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गणपतीपुळे ते मालगुंड या मुख्य रस्त्याची दैना उडाली असून अनेक ठिकाणी खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. गणपतीपुळे येथील देवस्थान जगप्रसिद्ध असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असतात. तसेच गणपतीपुळ्यात आलेले पर्यटक मालगुंड येथे केशवसुत स्मारक व अन्य ठिकाणांना भेट देत असतात. मात्र गेल्या काही दिवसात या मार्गाची पूर्णपणे दैना उडाली असुन या रस्त्यावरून वाहनांची वाहतूक करणे अडचणीचे होत आहे. त्यामुळे पर्यटकांबरोबर ग्र्रामस्थांमध्येही मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button