कोकण रेल्वे मार्गावर वेरावल एक्स्प्रेमध्ये महिलेची पर्स लांबविली, दीड लाखांचा ऐवज लंपास
रत्नागिरी ः कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास करणार्या महिलेची पर्स अज्ञात चोरट्याने लांबविण्याची घटना ८ दिवसांपूर्वी घडली असून त्याची तक्रार आता देण्यात आली आहे. या रेल्वेमधून प्रवास करणार्या महिलेचे पती शांतीलाल मोहनलाल (रा. दिवदमण) यांनी ही तक्रार शहर पोलीस स्थानकात नोंदविली आहे. हे कुटुंब वेरावल एक्स्प्रेसने प्रवास करीत असता ही रेल्वे रत्नागिरीजवळ आली असता पत्नीजवळ असलेली पर्स अज्ञात चोरट्यांनी पळविली. या पर्समध्ये सोन्याचे दागिने, रोख २० हजार व सॅमसंग कंपनीचा मोबाईल असे मिळून सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज होता.
www.konkantoday.com