सावंतवाडीत सापडले अंडा पॅटिसमध्ये प्लास्टिकसदृश तुकडा
सांगेली येथे राहणारी
गार्गी दीपक कुबल हिने शहरातील एका बेकरी मधून अंडा पेटीस घेतले. अंडा पॅटिस खाताना त्यातील प्लास्टिकसदृश तुकडा गार्गीच्या घशात अडकला. त्यामुळे तिचा श्वासही कोंडला. तिच्या वडिलांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तो तुकडा बाहेर काढला. ही मुलगी सांगेली येथे शाळेत शिकत असून ती क्लाससाठी सावंतवाडीत आली होती.त्यासंदर्भात तिच्या वडिलांनी व भावांनी बेकरी चालकाला जाब विचारला असता त्याने ते मान्य करण्यास नकार दिला.आमच्या पदार्थांमध्ये असा प्रकार होऊ शकत नाही असे त्याने सांगितले.बेकरी चालकांविरोधात मुलीचे वडील अन्न भेसळ विभागाकडे तक्रार करणार आहेत.
www.konkantoday.com